Tuesday, August 18, 2026
HomeNewsसिंधुताईंच्या आश्रमात लहान मुलांच्या हातून केक कापून, अन्नदान करून पत्रकार श्वेता गायकवाड...

सिंधुताईंच्या आश्रमात लहान मुलांच्या हातून केक कापून, अन्नदान करून पत्रकार श्वेता गायकवाड यांनी केला वाढदिवस साजरा

पुणे, दि. 17ऑगस्ट 2026

पत्रकार श्वेता गायकवाड यांचा वाढदिवस काल, १५ ऑगस्ट रोजी, सिंधुताई सपकाळ यांच्या पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील अनाथ मुलांच्या आश्रम शाळेत अत्यंत सामाजिक आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. लहान मुलांच्या हाताने केक कापून आणि त्यांना अन्नदान करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी श्वेता गायकवाड यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची आणि त्यांच्या आठवणींची उजळणी केली. तसेच आश्रमाचे संचालक, शिक्षक, संपूर्ण स्टाफ आणि लहान मुलांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात हा सोहळा अधिक अर्थपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमावेळी पत्रकार प्रिया गायकवाड, सामजिक कार्यकर्ते अतुल गौतम,पवन मनगट, गणराज मदाने,तन्मय मादर, प्रेनसी सचिन शर्मा , प्रेम चौधरी , शाहिस्ता शेख मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. केक कापणे, अन्नदान आणि मुलांसोबत घालवलेला आनंदाचा क्षण यामुळे वाढदिवसाची वेगळीच आठवण निर्माण झाली.या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, मायेचा स्पर्श आणि गरजू मुलांसोबत आनंद वाटण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments