---Advertisement---

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

On: September 26, 2025 7:07 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदि गावांची धनंजय मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी

शासनाकडे १००% नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करणार; मुंडेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला धीर

 

ममदापूर येथील पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना प्रशासनाची ४ लाखांची मदत सुपूर्द

 

परळी प्रतिनिधी l परळी वैद्यनाथ तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान व पुरपरिस्थीची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पाहणी केली.

 

या दरम्यानच तेलसमुख येथील एका शेतातील संपूर्ण कापसाच्या

उभ्या पिकाचे अती पावसाने पूर्णपणे नुकसान झाले असून, संबंधित शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत ला प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी महिलेला धनु भाऊंच्या समोर अश्रू अनावर झाले. शेतकरी महीलेने हाती आलेले संपूर्ण पीक नसून गेले आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

भाऊ, आता लेकीचे लग्र कसे लावू? असा प्रश्न उपस्थित करताच धनंजय मुंडे यांनी यांनी शासन आपली मदत करेल अका, तुम्ही मुलीच्या लग्राची काळजी करू नका, ठरलेल्या वेळीच लग्न होईल, तिच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो, असा शब्द देत मोलाचा आधार दिला. रेखाबाई तुकाराम कदम असे संबंधित शेतकरी महिलेचे नाव असून त्यांचे कापसाचे पूर्ण पीक पाण्याने नासून गेले आहे. परळी वैद्यनाथ तालुक्यात गोदावरी नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाण नदिसह लहान मोठ्या सर्वच नद्यांना आलेल्या पुराने अनेक ठिकाणी शेतीतील माती खरडून गेली आहे, काही ठिकाणी नदीतील दगड गोटे शेतात वाहून आलेत तर अजूनही पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी तेलसमुख, ममदापूर, बोरखेड आदी गावांना भेटी देऊन स्थानिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला, तसेच प्रशासनास १००% नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने योग्य पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान ममदापूर येथील ३८ बर्षीय तरुण शिवराज कदम हा पुराच्या पाण्यात दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री कौडगाव
हुडा येथील नदीच्या प्रवाहात बाहुन गेल्याने मृत झाला होता, त्या तरुणाच्या कुटुंबीयांना काल प्रशासनाच्या वतीने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. सदर रक्कम मयत शिवराज कदम यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यावेळी युवक नेते अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, राजाभाऊ पौळ, प्रभाकर पौळ, संजय जाधव, नितीन निर्मळ, भागवत कदम, बालासाहेब कदम, बसंत राठोड, भगवान पौळ, जानीमिया कुरेशी, उपविभागीय अधिकारी अरबिंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या सह महसूल, कृषी, पोलीस आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

धारूरमध्ये शेतकरी लाईटला त्रस्त; क्रेशरवाल्यांचा ‘ओव्हरलोड’ तर अधिकारी बेफिकीर! शेतकऱ्यांचा प्रश्न कोण ऐकणार?

मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल: जाहिरातबाजीवर तिखट टीका

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

ज्ञानदीप विद्यालयात विदयार्थी – पालक – शिक्षक समन्वय सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम संघटनेच्या शहराध्यक्षपदी सय्यद सादिक यांची निवड

Leave a Comment