किल्लेधारूर(मनोज जगताप)
धारूर शहरातील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून (ता.०१) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
धारूर शहरातील जय किसान गणेश मंडळ्याच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन गणेश उत्सव साजरा केला जातो. याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (ता.०१)ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीकांत निळे,पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे,मंत्रालय वरिष्ठ लिपिक बालाजी शिनगारे,नितीन शिनगारे,अतुल शिनगारे,संजय तिबोले,मोहन भोसले,पत्रकार अनिल महाजन,संदीपान तोंडे,अतुल शिनगारे,नाथा ढगे,सुनील कावळे,विश्वास शिनगारे,अजित शिनगारे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश सावंत मनोज जगताप ईश्वर खामकर, अण्णासाहेब गोन्ने ,गणेश गिरी सागर ढाणे ऋषिकेश गव्हाणे ,शुभम तिबोले. बंटी तिबोले, गजानन लांडगे, सुहास गव्हाणे, विशाल रंधवे, स्वप्निल धनवडे, शंकर पवार ईश्वर उमाप अमोल पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिबिरास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी श्री गणेशाच्या मूर्तीची आरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी तहसीलदार निळे पोलीस निरीक्षक वाघमोडे, पत्रकार अनिल महाजन,संदीपान तोंडे,नाथा ढगे,सुनील कावळे,मोहन भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या यावेळी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवत ४० तरुणांनी रक्तदान केले.




