19.8 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img

वाण नदी पाञात गेली दोन वाहने वाहून एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध अद्याप नाही महसूल व पोलीस प्रशासन व्यक्तीच्या शोधात तत्परतेने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

वाण नदी पाञात गेली दोन वाहने वाहून एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध अद्याप नाही महसूल व पोलीस प्रशासन व्यक्तीच्या शोधात तत्परतेने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

किल्लेधारूर (मनोज जगताप)
वाण नदीचा उगम हा धारूर तालुक्यातून आहे या तालुक्यातून विविध रस्त्यावरून या नदीचे पात्र जाते धारूर ते असरडोह रस्त्यावर बुधवारी सायंकाळी एक कार वाहून गेल्याने एक व्यक्ती ही वाहून जाऊन त्याचा मृतदेह सापडला तर धारूर ते आडस रस्त्यावर आवरगाव नजीक नदीपात्रात राञी बारा ऩतर एक ऑटो वाहून गेला आहे या मधील ऑटो चा शोध लागला मात्र संबंधित व्यक्तीचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही याच्या शोधात प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने कार्य करत आहे नागरिकांनी मात्र दक्षता बाळगण्याचे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

धारुर तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे सर्व नदी नाले ओंसडून वाहत होते धारूर ते असरडोह रस्त्यावर रात्री आठच्या नंतर रुई धारूर कडून अ़जनडोह कडे येणारी टाटा कंपणीची जस्ट गाडीत धारुर मोंढ्यात आडत दुकान असणारे व्यापारी नितिन शिवाजीराव कांबळे हे घरी जात असताना अंजनडोह ते रुईधारूर दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने गाडीसह ते वाहून गेले महसूलचे पथक नायबतहसीलदार सुरेश पाळवदे व पोलीसचे पथक सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांचे नेतृत्वा खाली राञी गावकरी व सामाजिक कार्यकर्त्याचे मदतीने शोध घेतला माञ हे रस्त्या पासून उत्तरेलाशंभर मिटर वरचे बंधारा चे बाजूला झाडाला अडकलेला नितिन कांबळे या़चा मृतदेह मिळाला माञ गाडी चा शोध माञ लागला नाही.

 

या पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून थोडा ही पाऊस झाला तर जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या घटने मुळे तालूका भयभीत असताना धारूर आडस रस्त्यावर आवरगाव जवळ वाण नदी पाञाचे पाणी ओ़सडून वाहत असल्याने अ़बाजोगाई हून आपला ऑटो रिक्षा दुरूस्ती करून धारूर कडे राञी बारा नंतर येत असताना ऑटो सह नदी पाञात अनिल बाबूराव लोंखडे वय 26 वर्ष रा स़भाजीनगर गोपाळपूर धारूर येथील हा वाहून गेला या घटनेतील ऑटो गुरूवारी सकाळी नदी पाञात पन्नास फुटावर सापडला. महसूल व पोलीस यंञणा या़नी या व्यक्तीचा शोध सुरू केला असून जिल्हा स्थानीक बचत पथक ही पाचारण केले असून हे शोध घेत आहे. दुपारी उशीरा पर्यंत आवरगाव घटनेतील व्यक्तीचा शोध लागला नव्हता. शोध माञ वेगाने सर्वञ नदीपाञात ला़ब पर्यंत शोध मोहीम सुरू होती या घटने मुळे माञ सर्वञ भितीचे वातावरण पसरले आहे.

 

नागरीकानी दक्षता घ्यावी –नायब तहसीलदार पाळवदे
तालूक्यातील नागरीकानी पुलावरून पाणी वाहत असेल तर आपले वाहण त्यावरून नेऊ नये. आपली जिवाची सुरक्षीतता बाळगावी असे अवाहण नायब तहसीलदार सुरेश पाळवदे या़नी केले आहे

ads

Related Articles

ताज्या बातम्या