मिसींग प्रकरणाचा चोवीस तासाच्या आत उलगडा, महिलेचा खुन उघडकीस आणुन आरोपी महिलेस पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक.
बीड प्रतिनिधी l दि. 20/08/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे अयोध्या राहुल व्हरकटे वय 27 वर्षे रा. लुखामसला, ता. गेवराई, जि. बीड ही महिला मिसिंग झाल्याची तक्रार तिचा भाऊ ज्ञानेश्वर सुभाष मुरनर यांनी दाखल केली होती.
या मिसींग तक्रारीचा तपास चालू असताना दि. 21/08/2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या हिचा खून झाल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह उमरद (जहांगीर) ता. व जि. बीड शिवारातील झाडाझुडपात आढळून आला.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार, अयोध्या हिचा खून वृंदावणी सतिष फरतारे व तिचा मुलगा यांनी संगनमत करून मृत अयोध्या राहुल व्हरकटे वय 27 वर्षे रा. लुखामसला, ता. गेवराई, जि. बीड हिचा खुन करुन तिचा मृतदेहा हा पुरावा नष्ट करण्याचे हेतुन मृतदेह उमरद (जहांगीर) ता. व जि. बीड शिवारात टाकुन दिला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे गुरनं 439/2025 कलम 103,238,3 (5) भारतीय न्याय संहिता या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गजानन क्षीरगसार हे करत आहे.
सदर कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, उपविपोअ श्री. हानपुडे पाटी. साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार, सहा. पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर, सहा. पोलीस निरीक्षक विलास मोरे, पो.उप.नि. धोत्रे, स. फौ. कदम पो.ह. रविंद्र आघाव, संतोष राऊत, म.पो.ह. मिरा पाटील, शितल जोगदंड, पो.कॉ. शुभम सोनवणे, अशोक राडकर, दिलीप राठोड, विलास कांदे, बाळु रहाडे, धनंजय येवले, अनिल घटमाळ, राजाभाऊ जाधव, नवनाथ डाके यांनी केली.