बीड प्रतिनिधी l बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे समुळ उच्चाटनकरण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर तसेच वाळुमाफीयावर MPDA कायदया अंतर्गत कार्यवाया सुरू केल्या आहेत.
या पार्श्वभुमीवरच पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन सहा. पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे पोलीस ठाणे चकलांबा, जि. बीड यांनी दिनांक 22.08.2024 रोजी आरोपी सुरज विठ्ठल ढाकणे वय 27 वर्षे रा. मुंगी ता. शेवगांव जि. अहील्यानगर याचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे चकलांबा येथे खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जाळपोळ करणे, गौण खनिज वाळुची चोरी करणे, वाळुचोरीचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी नौकरावर हल्ला करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे अवैद्यशस्त्र बाळगणे, वगैरे स्वरुपाचे 09 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहेत. सर्व गुन्हे न्याय प्रविष्ठ आहेत. सदरील व्यक्ती हा गौण खनिज वाळुचोरीचे व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हेकरत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासुन करडी नजर होती.
सदर इसमावर यापुर्वी CrPC 110 प्रमाणे दि.05.10.2023 रोजी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा तेच गुन्हेकरण्याचे चालुच ठेवत होता. त्याची पोस्टे चकलांबा हद्दीत व लगतच्या परीसरात दहशत आहे. त्याचे विरुध्द लोक फिर्याद देण्यास अथवा साक्ष देण्याससमोर येत नाहीत.
सदर प्रकरणात श्री. अविनाश पाठक, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 19.09.2024 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचेकडील आदेशक्रमांक जा.क्र. 2024/आरबी डेस्क- 1/पोल-1/एम.पी.डी.ए 15 दिनांक 19.09.2024 अन्वये आदेश पारीत केले होते.
त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना स.पो.नि.श्री. नारायण एकशिंगे पो.स्टे. चकलांबा यांना दिल्या होत्या. स्थानबध्दतेचे आदेश पारीत झाल्या पासुन सदरचा इसम हा स्वतः चे अस्तीत्व लपवुन वावरत होता. तसेच तो पोलीसांना गुंगारा देवून फरार होता. सदरची बाब ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या चानाक्ष नजरेतुन लपवुन राहीली नाही. त्यांनी संदीप पाटील स.पो.नि चकलांबा व शिवाजी बंटेवाड पोनि स्थागुशा, बीड यांना आदेशीत करून सदर वाळुमाफीयास तात्काळ ताब्यात घेवुन स्थानबध्द करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तेव्हा पासुन पोलीस त्याच्या मागावर होते.
दिनांक 18.07.2025 रोजी शिवाजी बंटेवाड पोनि स्थागुशा, बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, सदर इसम हा पैठण तालूक्यात चोरुन लपुन वावरत आहे. त्यावरुन पोनि स्थागुशा, बीड यांनी पोउपनि सिद्धेश्वर मुरकुटे स्थागुशा, बीड यांचे पथक रवाना केले.
सदरच्या इसमास पथकाने दि. 18.07.2025 रोजी मुंगी फाटा येथे ताब्यात घेवुन पोलीस ठाणे चकलांबा येथे दि. 18.07.2025 रोजी 20.25 वा हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात स.पो.नि चकलांबा यांनी ताबे पोलीस अंमलदारा मार्फत हसुंलकारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 19.07.2025 रोजी 01.15 वा. हजर करुन स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर, उपविपोअ गेवराई निरज राजगुरु, पो.नि. शिवाजी बंटेवाड, स्थागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि संदीप पाटील, पोउपिन अनंता तांगडे, सफौ सोमनाथ कुलकर्णी, अमोल येळे, कैलास खटाणे सर्व पो. स्टे चकलांबा पोउपनि सिद्धेश्वर मुरकुटे, सपोउपनि अभिमन्यु औताडे, पोह राहुल शिंदे, विकास राठोड, मनोज परजणे, अश्पाक शेख, नितीन वडमारे, बिबीसेन चव्हाण स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, जुगार/ लॉटरी खेळणारे व खेळवीणारे तसेच धोकादायक गुंड यांचेवर व दादागिरीकरणाऱ्या व खंडणी बहाद्दर गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदया अंतर्गतकठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले आहेत.