माऊली ग्रुपच्या पायी दिंडीचे आयोजन
गेवराई: गेल्या अनेक वर्षांपासून धाकलगाव, गेवराई, येथील माऊली भक्त आषाढ महिन्यांत धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी अशी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येत असून याही वर्षी आज दि.20 जुलै रोजी पायी दिडी निघणार आहे तरी या दिंडीत सहभागासाठी माऊली भक्तांनी 8669092094 या मोबाईल नबंरवर संपर्क साधून धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान माऊली भक्त अंबादास गिरी, विठ्ठल जगदाळे,वादे, दशरथ गावडे, बळीराम उडें, अशोक बीडे, यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की गेली अनेक वर्षांपासून धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे आयोजन माऊली ग्रुपच्या वतिने करण्यात येत असून या दिंडीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात तसेच धाकलगाव, शहागड, गेवराई, गढी,राजणी, पाडंळसिगी,हिरापुर,पेडगाव, बीड , कपिलधार, माजंरसुबा नेकनुर, मार्गै चाकरवाडी या मार्गे पायी दिंडी काढण्यात येत असते तरी ज्या माऊली भक्तांना दिडीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी अंबादास गिरी यांच्या 8669092094 या मोबाईल नबंरवर संपर्क साधून दिंडीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आव्हान अंबादास गिरी, विठ्ठल जंगदाळे, अशोक बीडे,बळीराम उडे, वादे,दशरथ गावडे आदीनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे