24.2 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img

माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन

 

 

राजकीय व जिल्ह्यासह सर्वत्र वर्तुळात शोककळा पसरली आहे.

बीड प्रतिनिधी/ लातूर जिल्ह्यातील बेलकुंड ता. औसा परिसरात दि.२६ मे २०२५ रोजी सोमवार भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आर.टी. देशमुख (जिजा) यांचे दुर्दैवी निधन झाले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे कळले आहे.

 

आर.टी. देशमुख यांची गाडी नंबर एमएच ४४ एडी २७९७ औसा रोडवर या क्रमांक च्या गाडीचा अपघात झाला. याच गाडीत त्यांचा मृत्यू झाला आहे. ते लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते.

 

माजलगावमधून ते आमदार झाले. भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय व जिल्ह्यासह सर्वत्र वर्तुळात आणि भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

हा अपघात पावसामुळे रस्त्याच्या कडेला जमा झालेल्या पाण्यामुळे गाडी स्लिप होऊन नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आसल्याचे समजले आहे.

 

आर. टी. देशमुखांना जबर मार लागल्यामुळे यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. गाडीत आर. टी. देशमुख यांच्यासह त्यांचा अंगरक्षक आणि चालक प्रवास करीत होते.

 

चालक आणि अंगरक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

ads

Related Articles

ताज्या बातम्या