गेवराईत जिल्हा वाहतुक शाखेची नियम मोडणार्या वाहनधारकांवर कारवाई
बीड (प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनखाली आज जिल्हा वाहतुक शाखेने गेवराई येथे नियम मोडणार्या वाहनधारकांवर कारवाई केली यावेळी 93 केसेस आणि 65 हजार रुपयांचा दंड वाहनधारकांना ठोठावला तसेच रोख 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बीड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक नवनीत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत तसेच सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी देखील नियम मोडणार्या वाहनधारकांवर जरब बसावा या करिता कार्यवाही सुरु आहे.
जिल्हा वाहतुक शाखेने मोटार वाहन कायद्या अंतर्गत गेवराई येथील शिवाजी चौक, बस स्टॅन्ड परिसर येथे जिल्हा वाहतुक शाखा आणि गेवराई वाहतुक शाखा ही जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय,गेवराई पोस्टचे पोलीस निरीक्षक प्रविण, पोलीस हवालदार शांतीलाल, दत्ता पोलीस आजिनाथ, पोलीस हवालदार पांडुरंग चालक पोलीस हवालदार राम पोलीस हवालदार नारायण गेवराई पोस्टचे पोलीस हवालदार विजय, किरण यांनी दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान गेवराईत विविध कलमांतर्गत लायसन्स नसणे, विमा नसणे, काळी काच, नो पार्किंग, ट्रिपलसीट या सदराखाली एकुण 93 केसेस आणि 65 हजार रुपयांचा दंड वाहनधारकांना ठोठावला तसेच रोख 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.