4.3 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img

अजित पवार यांच्या – उपस्थितीत होणाऱ्या युवा संवाद मेळाव्याला उपस्थित रहा : बबनराव गवते 

 

 

बीड प्रतिनिधी l राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधणी आणि संघटन वाढविण्याचे काम सुरू असून (दि.२ एप्रील) रोजी बीडमध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आ.अमरसिहं पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे.

 

या मेळाव्यास बीड मतदार संघांतील राष्ट्रवादीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे अवाहन बबनराव गवते पाटील यांनी केले आहे.

 

बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा एव युवा संवाद मेळावा होत आहे. सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात होईल.

 

कार्यक्रमास आ.धनंजय मुंडे, आ.प्रकाश सोळंके, आ. विजयराजे पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आ. बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे हे उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणूकीनंतर बीड मतदारसंघात पक्षसंघटन आणि बांधणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. बीड येथे होत असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन बळीराम गवते यांनी केले असून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा. आ. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा युवा संबाद मेळावा होत आहे.

 

स्पष्टवक्ते म्हणून उपमुख्यमंत्रीअजित पवार यांची ओळख असून त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी (दि.२ एप्रील) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी ८ वाजता बीडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर ते पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवकांशी संवाद साधणार आहेत.

या युवक मेळाव्यास जिल्ह्यातील डॉ. योगेश क्षीरसागर, प्रज्ञा खोसरे, फारूक पटेल, अमर नाईकवाडे यांच्यासह इतर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास सर्व युवक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन जेष्ठ नेते बबनराव गबते यांनी केले आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या