---Advertisement---

*बीड एमआयडीसीबाबत आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली मंत्री ना.उदय सामंतांची भेट*

On: March 7, 2025 7:37 AM
Follow Us:
---Advertisement---

 

बीड दि.६ (प्रतिनिधी):- बीडच्या एमआयडीचा विकास व्हावा याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून आ.संदीप क्षीरसागर शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यातच गुरूवारी (दि.६) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधीमंडळात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली.

 

बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा याकरिता बीड शहरात स्थित असलेल्या औद्योगिक वसाहतीचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून त्याठिकाणी मोठमोठे उद्योग येतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल तसेच आर्थिक स्थिती सुधारेल. ही बाब लक्षात घेऊन आ.संदी प क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या एमाआयडीसीच्या विकासासाठी पाठपुरावा करत आहेत. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक अधिकारी आदी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेतही बैठका घेतल्या होत्या.

 

पीआता पुन्हा यासंदर्भात, मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली आहे. दरम्यान याविषयी ना.सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सविस्तर बैठक लावण्याचे सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

धारूरमध्ये शेतकरी लाईटला त्रस्त; क्रेशरवाल्यांचा ‘ओव्हरलोड’ तर अधिकारी बेफिकीर! शेतकऱ्यांचा प्रश्न कोण ऐकणार?

मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल: जाहिरातबाजीवर तिखट टीका

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

ज्ञानदीप विद्यालयात विदयार्थी – पालक – शिक्षक समन्वय सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

Leave a Comment