-6 C
New York
Sunday, December 22, 2024

Buy now

spot_img

मुंबई बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; CM फडणवीसांची घोषणा.

 

मुंबईतीलएलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने (Elephanta Boat Accident) धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Chief Minister’s Relief Fund) मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मुंबईजवळील बुचर आयलंडजवळ दुपारी 3.55 वाजता नौदलाच्या स्पीड बोटने नीलकमल नावाच्या बोटीला धडक दिली. ही मोठी दुर्घटना आहे.

 

या अपघातात 101 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. नौदलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत 13 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यात 3 नौदल कर्मचारी आहेत. तर 10 नागरिकांना मृत घोषित करण्यात आलंय, अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. बेपत्ता लोकांसाठी शोध कार्य सुरूच आहे, असं फडणवीस म्हणाले.

 

ते म्हणाले, ही आकडेवारी अंतिम नसून अद्याप कोण बेपत्ता असेल किंवा मृत असेल, याची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत मिळेल, सध्या जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं फडणवीस यांनी सांगितले.

 

या बोटीची क्षमत 80 प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण 110 प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलतांना फडणवीसांनी या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याचं सांगितलं.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

 

 

दरम्यान, मृत 13 जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई पालिकेकडून माहिती

मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अधिकृत माहिती दिली की बोटीवर सुमारे 110 जण होते. 110 प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, नीलकमल बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचा संशय नौदलाने व्यक्त केला आहे.

कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण आहेत?

जेएनपीटी रुग्णालय – 56

नेव्ही डॉकयार्ड हॉस्पिटल – 32
अश्विनी हॉस्पिटल – 1
सेंट जॉर्ज हॉस्पिटल – 9

करंजे हॉस्पिटल- 12

Related Articles

ताज्या बातम्या