-7.2 C
New York
Sunday, December 22, 2024

Buy now

spot_img

मराठी पत्रकार परिषद च्या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद* *बीड जिल्ह्यात 1 हजारांच्या वर पत्रकारांनी सहभाग नोंदवल्या बद्दल *- *मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख*यांनी मानले आभार*

 

बीड (प्रतिनिधी):- मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदशनाखाली पूर्ण राज्यात काल 3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषद च्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यात जागोजागी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

 

यावेळी एकूणच जवळपास राज्यातून 10 हजारांच्या वर पत्रकारांनी आपल्या परिवारासह या शिबिरात सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी केल्या बद्दल एस एम देशमुख यांनी मानले आभार.

 

बीड जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने काल बीड जिल्हा रुग्णालयात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

बीड जिल्हात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातून सर्व अकरा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यात बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर(का.) या तालुक्यातून मराठी पत्रकार परिषद ने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आपल्या परिवाराच्या व स्वतःच्या आरोग्याच्या मोफत तपासण्या करून घेतल्या आहेत. व जवळपास 1 हजारांच्या वर या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान व आरोग्याची तपासणी केल्या बद्दल एस एम देशमुख यांनी मानले आभार. आहे.

 

यावेळी मराठी पत्रकार परिषद चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर, बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात,मराठी पत्रकार परिषदेचे संभाजीनगर विभागाचे समन्वयक सुभाष चौरे ,राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हंगे, जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे, बीड तालुका अध्यक्ष दत्ता आजबे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमान्यु घरत,तालुका समन्वयक लक्ष्मण नरनाळे, तालुका निमंत्रक मंगेश निटुरकर, अशोक खाडे,अनिल जाधव आदींनी उपस्थिती होती.

 

पत्रकारांचे आरोग्य शिबीर सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत पार पडले यात बीड जिल्हा रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी सर्व पत्रकार बांधवांच्या तपासण्या केल्या यात डॉ.शहाणे,डॉ. पारखे, डॉ. काळे, डॉ.राऊत, व रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कट्टे मॅडम,डॉ.नाईकवाडे मॅडम,डॉ.रोहिणी सवासे मॅडम तसेच रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी श्रीमती गालफाडे, रक्तपेढी तंत्रज्ञ सचिन स्त्कर, विनोद रावतळे, विनय कुंभार, सेवक दिलीप औसरमल या खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

या शिबीराचा बीड तालुक्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घेतला.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदशनाखाली संभाजीनगर विभागीय समन्वयक सुभाष चौरे, परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा परिषदे प्रमुख संजय हंगे ,जिल्हा उपाधयक्ष रवी उबाळे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यु घरत, संपादक राजेंद्र होळकर, हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका निमंत्रक मंगेश निटुरकर, समन्वयक लक्ष्मण नरनाळे, बीड तालुकाध्यक्ष दत्ता आजबे, कार्याध्यक्ष रेहान शेख, कोषाध्यक्ष प्रशांत लहुरीकर, सरचिटणीस प्रचंड सोळंके आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या