केज/प्रतिनिधी
स्व.बाबुरावजी आडसकरांनी गेल्या पन्नास वर्षांपासुन निर्माण केलेली परंपरा ही दिपावली पाडव्याची असुन ती केवळ राजकीय परंपरा नसुन ती एक सामाजिक एकात्मतेचे दर्शन दाखविणारी परंपरा असुन या ठिकाणी माणुस एकमेकाला भेटतो,सुख दुःख एकमेकांना सांगतो.
माणुस माणसाबरोबर बसल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते, हाच या परंपरेचा मुख्य हेतू होता.
ही परंपरा स्व.माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांच्या पश्चातही सुरु ठेवणार आहे असे प्रतिपादन रमेशराव आडसकर यांनी केले. ते आडस येथील दिपावली पाडव्याच्या स्नेह मिलन सोहळ्यात बोलत होते.
राजकारणात काम करतांना माणूस केंद्रबिंदू मानुनच काम केल्यामुळे आडसकरांच्या वाड्याला विशेष महत्त्व आले.
राजकीय संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पुजल्यामुळे मी कधीच रडत बसत नाही.नेहमीच सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी लढतो आहे.
या प्रसंगी स्व.माजी आमदार आडसकर यांच्या काळातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी माजी सरपंच रावसाहेब राऊत, बाजार समितीचे चेअरमन अंकुशराव इंगळे,शिनगारे साहेब,हारुणभाई इनामदार यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी केज नगरिच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड,माजी आमदार संगिताताई ठोंबरे,केजच्या बाजार समितीचे चेअरमन अंकुशराव इंगळे,भारतराव सोळंके, रमाकांत बापु मुंडे, धारुर मार्केट कमिटीचे तोंडे,शेषेराव फावडे , शिवाजी मायकर,बालासाहेब इंगळे उपस्थित होते. केज , अंबाजोगाई,धारुर तालुक्यातील राजकीय , सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज
व्यक्ती उपस्थित होते.
दिपावलीच्या फराळानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.