केज/प्रतिनिधी
आरक्षण योध्दा जरांगे पाटील समर्थक सौ.सीताताई बनसोड यांना उमेदवारी मिळाल्यास एमथ्रीचा फॉर्मुला यशस्वी होईल. असे मतदारांतुन बोलले जात आहे तर केज मतदार संघामध्ये सीताताई बनसोड यांना पसंती मिळत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
केज विधानसभा मतदारसंघात आरक्षण योध्दा जरांगे पाटील समर्थक म्हणून विजयाची तयारी केलेल्या सीता बनसोड यांना जर या निवडणुकीत जरांगे पाटलांनी समर्थन दिले तर एम थ्री फॉर्म्युला केज मतदारसंघात यशस्वी होऊन त्या विजयी होऊ शकतात आशा प्रतिक्रिया मतदारसंघातुन येत आहेत.
केज विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील समर्थक म्हणून अनेकांनी आपली उमेदवारी दाखल केलेली पहायला मिळत आहे परंतु त्यापैकी केजच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड या सर्वात सक्षम समजल्या जात आहेत. सीताताई बनसोड यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन या निवडणुकीची तयारी केली आहे. त्या दलित समाजातून आहेत तर त्यांचे मार्गदर्शक आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख
हारुणभाई इनामदार हे मुस्लिम समाजातून आहेत.
केज,नेकनूर, अंबेजोगाई या मोठ्या गावांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे व या जोडगोळीला जर जरांगे पाटलांनी विधानसभेसाठी समर्थन दिले तर मराठा समाज , मुस्लिम समाज आणि दलित समाज असा एम थ्री चा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो आशा प्रतिक्रिया मतदारसंघातुन व्यक्त होताना पहायला मिळत आहेत.
सामाजिक, राजकीय चळवळीत हारूणभाई इनामदार हे अठरापगड समाज बांधवांना सोबत घेऊन व गोरगरिबांच्या अडी अडचणीला धावून येणार नेतृत्व त्यांची ओळख आहे.