24.3 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

https://youtu.be/bH2LPye4bfg?si=0x6KRXcByEYkUh5L

मी कायम जनतेत आहे त्यामुळे आता माघार नाही लढायचे आणि जिंकायचं- योगेश क्षीरसागर यांनी विधानसभा उमेदवारी हजारोंच्या कार्यकर्त्या समवेत अर्ज भरला.

बीड प्रतिनिधी। मी कायम जनतेत आहे त्यामुळे आता माघार नाही लढायचे आणि जिंकायचं योगेश क्षीरसागर यांनी विधानसभा उमेदवारी हजारोंच्या कार्यकर्त्या समवेत अर्ज भरला. मी गेल्या वर्षापासून अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आहे तेव्हापासून मी माझे सर्व काम धंदे सोडून अगदी माझे वडील आजारी असताना देखील मी त्यांच्या विचार न करता कायम जनतेमध्ये राहून जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या अडचणी सोडवल्या पण आहेत त्यामुळे मी जनतेच्या मनातला खरा कार्यकर्ता म्हणून माझी जनतेत ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे मी तिन्ही पक्षाला विनंती करतो की मला काम करण्याची संधी द्यावी माझे एवढं काम आतापर्यंत कोणीही केले नसेल, एवढं मी कायम जनतेत राहून जनतेच्या अडीअडचणी सोडवल्यावआहेत, आणि लोक माझ्याकडे त्यांच्या अडी अडचणी घेऊन येतात.

त्यामुळे आता माघार नाही लढायचे आणि जिंकायचं हेच ध्येय आपल्यासमोर डोळ्यासमोर असेल/ आहे त्यामुळे सर्वांनी मिळून मला साथ द्यावी व विधानसभेवर निवडून आणून द्यावे पुन्हा मी तुमचे सर्वांचे पूर्ण ताकतीनिशी काम करेल असे वचन आपणा सर्वांना देतो असे म्हणत योगेश क्षीरसागर यांनी आपला विधानसभेचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या की, बीड का नेता कैसा हो योगेश भैया जैसा हो अशा घोषणा देत योगेश भैया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या समवेत डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अर्ज दाखल केला आहे

ads

Related Articles

ताज्या बातम्या