24.3 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

गेवराई-जातेगाव- सेलू रस्त्यामुळे वीस ते पंचवीस गावच्या दळणवळनाचा मार्ग होणार सुकर – आ.लक्ष्मण पवार* *114 कोटी रुपयाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे आ.पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*

  • गेवराई (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्वच प्रमुख रस्त्याचे प्रश्न आता मार्गी लागले आहेत.
  • तसेच गेल्या अनेक वर्षापासून जातेगाव-गेवराई या मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. याबाबत मी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर अखेर या रस्त्याला महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ अंतर्गत मंजुरी मिळाली असून या रस्त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेच्या दळणवळणाचा मार्ग सुकर होणार असल्याचे प्रतिपादन आ.लक्ष्मण पवार यांनी केले.

दि. 15 रोजी सकाळी केकत पांगरी येथे गेवराई – जातेगाव – सेलू या 114 कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उदघाटन आ.लक्ष्मण पवार यांच्या हस्ते व युवा नेते शिवराज पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 

या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रकाश काका सुरवसे, राहुल जिजा खंडागळे, सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षभुवनकर, भगवान घुंबार्डे, प्रा.शाम कुंड, शिनुभाऊ बेदरे, दादासाहेब गिरी, मधुकर वादे, आप्पा कानगुडे, राम पवार, समाधान मस्के, अमोल मस्के, ईश्वर पवार, लक्ष्मण चव्हाण, मुन्ना शेठ यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी पुढे बोलताना आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षाच्या काळात आपण केलेली कामे ही जनतेच्या कायम स्मरणात राहतील. माझ्या परीने मी प्रामाणिक प्रयत्न करून मोठ्या प्रमाणात निधी आणून तालुक्याच्या तळागाळातील राष्ट्याव्हे प्रश्न मार्गी लावले. तसेच येणाऱ्या काळातही आपण आता जलसिंचनाच्या प्रश्नावर काम करणार आसल्याचे त्यांनी सांगितले. तर जातेगाव सर्कल मधील ग्रामीण भागातील जवळपास सर्व गावचे प्रमुख रस्ते यापूर्वी आपण पूर्ण केलेले आहेत. हाच मुख्य रस्ता बाकी होता आता तो ही मार्गी लावला आहे. हा पूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटने होणार असून तो दर्जेदार आणि टिकाऊ करून घेण्याची आपली जबाबदारी आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळवळणाचा मार्ग सुकर होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

या कार्यक्रमाला सरपंच ज्ञानेश्वर जाधव, बाळासाहेब लगड, कृष्णा पाटोळे, गोपाल चव्हाण, रमेश राठोड, छगन पवार, कृष्णा पवार, रमेश राठोड, लक्ष्मण कोकाट, दत्ता गिरे, शिवाजी राठोड, परमेश्वर गिरे, राजकीरण लगड, बाळू पांढरे, आत्माराम जगताप, विष्णू महाराज जगताप, कारभारी कोकरे, देवराज कोळे, दादासाहेब चव्हाण, पापा पंडित, प्रकाश पवार, सुरेश पवार, मोहन जाधव, भास्कर खवले यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ads

Related Articles

ताज्या बातम्या