-6 C
New York
Sunday, December 22, 2024

Buy now

spot_img

सूर्यापासून हिसकावून घेणार कर्णधारपद!

Captaincy T20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर भारतीय T20 संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 मधून निवृत्त झाले आहेत, तर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे.

पण सर्वात मोठा बदल सूर्यकुमार यादवला T20 संघाचा कर्णधार बनवताना दिसून आला. श्रीलंका मालिकेपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. हार्दिक पंड्या हा संघाचा कर्णधार होण्याचा सर्वात मोठा दावेदार होता. या सगळ्यात एका दिग्गजाचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. या अनुभवी खेळाडूच्या मते, पांड्याला पुन्हा कर्णधार बनवले जाऊ शकते.

समालोचक हर्षा भोगले यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मोठे विधान केले आहे. हर्षा भोगले यांच्या मते, हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनू शकतो. यामागचे कारणही त्यांनी दिले आहे. captaincy हर्षा भोगले यांच्या म्हणण्यानुसार, पांड्याला व्यवस्थापनाने पांढऱ्या चेंडूचे सर्व सामने खेळण्यास सांगितले आहे आणि त्याच्यासाठी कर्णधारपदाचे दरवाजे खुले आहेत. व्यवस्थापन फक्त सूर्यकुमार यादवची चौकशी करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कर्णधार होण्यासाठी हार्दिकला तंदुरुस्त राहावे लागेल आणि पांढऱ्या चेंडूचे सर्व सामने खेळावे लागतील.

टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी पहिली पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान बीसीसीआयचे मुख्य निवडक अजित आगरकरही त्यांच्यासोबत प्रश्नांची उत्तरे देताना दिसले. त्यानंतर पत्रकार परिषदेत टी-20 संघाच्या नव्या कर्णधाराबद्दल बोलताना अजित आगरकर म्हणाले होते की, सूर्यकुमार यादव हा एक चांगला पर्याय आहे. त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे. captaincy त्याचबरोबर हार्दिक आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.

त्याच्यासारखी प्रतिभा मिळणे कठीण आहे. पण गेल्या 2 वर्षात त्याचा फिटनेस हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत आम्हाला कर्णधार म्हणून नेहमी उपलब्ध असणारा आणि आपली भूमिका चोख बजावू शकेल असा खेळाडू हवा होता. सूर्यामध्ये ते सर्व गुण आहेत.टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिका खेळली. भारतीय संघाला वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.

पण सूर्याच्या नेतृत्वाखाली टी-20 संघाने मालिका जिंकण्यात यश मिळवले. या काळात सूर्याची कामगिरीही चांगली झाली. 2026 टी-20 विश्वचषकापर्यंत सूर्याला कर्णधार बनवल्याचीही बातमी समोर आली आहे. पण हर्षा भोगलेच्या या वक्तव्यामुळे पंड्याच्या आशा वाढल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या