बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता स्पर्धकांच्या वागण्यामुळे चर्चेत आला आहे. वादांमुळे तो सध्या गाजत आहे. अशातच बिग बॉसने घरातील सदस्यांना एक जादुई फोन दिला.
या फोनच्या मदतीने ते आपल्याला सोडून गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधू शकतात. शेवटचं काही सांगायचं राहिलं असेल तर ते सांगू शकतात. स्पर्धकांनी आपल्या जवळच्या लोकांना फोन करून मनातील भावना व्यक्त केल्या. सर्वांसाठीच हा एक भावूक करणारा क्षण होता.
गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणने देखील आपल्या आई-वडिलांना यावेळी फोन केला. सूरजचे आई-बाबा आता या जगात नाहीत. आई-आप्पा तुमची खूप आठवण येते, मी तुम्हाला खूप मिस करतो, तुम्ही मला सोडून का गेलात? असं म्हणत सूरज ढसाढसा रडला. “आई- आप्पा तुमची आठवण येतेय. तुम्ही मागचा पुढचा विचार का नाही केला. तुमच्या बाळाचा, माझा विचार का नाही केला?”