-7.2 C
New York
Sunday, December 22, 2024

Buy now

spot_img

रहाणेचा नवा अवतार! इंग्लंडमध्ये षटकारांचा पाऊस पाडत संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत. मागील वर्षी आयपीएलमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात संधी मिळाली होती.

केवळ त्या एक सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याचा फॉर्म पुन्हा गेला. त्यामुळे आता त्याचे पुनरागमन करणे कठीण वाटू लागले आहे. मात्र, सध्या त्याने त्याच्या फलंदाजीची पद्धत पूर्णपणे बदलल्याचे दिसते.

वाढत्या वयाबरोबर रहाणे गोलंदाजांमध्ये वेगळीच दहशत निर्माण करत आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन-डे कपच्या लीसेस्टरशायर आणि हॅम्पशायर यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीत त्याने स्फोटक खेळी खेळली आणि संघाला उपांत्य फेरीत नेले.

उपांत्यपूर्व सामन्यात लीसेस्टरशायर संघाने 3 गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवला. या विजयासह गतविजेता लीसेस्टरशायर संघ वनडे कप स्पर्धेच्या विजेतेपदापासून केवळ 2 पावले दूर आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने 86 चेंडूंत 2 चौकार आणि 3 उत्कृष्ट षटकारांच्या मदतीने 70 धावांची उत्कृष्ट खेळी केली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार निक गुबिन्सचे शानदार शतक आणि अनुभवी लियामच्या अर्धशतकाच्या जोरावर हॅम्पशायर संघाने निर्धारित 50 षटकांत सात गडी गमावून 290 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. डॉमिनिक केलीनेही डावाच्या शेवटी 20 चेंडूत 39 धावांची जलद खेळी केली. मात्र, लीसेस्टरशायरची फलंदाजी पाहता ही धावसंख्या किरकोळ ठरली. रहाणेसह पीटर हॅंड्सकॉम्ब व ट्रेस्कोवस्की यांनी झळकावलेल्या अर्धशतकांमुळे संघाने अखेरच्या षटकात 3 गडी राखून सामना जिंकला.

रहाणे याला नुकत्याच जाहीर झालेल्या दुलिप ट्रॉफी साठीच्या संघांमध्ये जागा मिळाली नाही. तर, सध्या येत असलेल्या वृत्तानुसार, रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईची साथ देखील सोडू शकतो. तसेच, भारतीय संघातील त्याचे पुनरागमन जवळपास अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या