---Advertisement---

ज्ञानदीप विद्यालयात विदयार्थी – पालक – शिक्षक समन्वय सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

On: September 14, 2025 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

*ज्ञानदीप विद्यालयात विदयार्थी – पालक – शिक्षक समन्वय सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

किल्ले धारूर (मनोज जगताप)
किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बालसंस्कार केंद्रात विद्यार्थी-शिक्षक-पालक समन्वय सभा तसेच विवीध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ पालक श्री. रघुनाथ इरमले, प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी श्री. गोवर्धन बडे, श्री. शंकर विभुते, श्री. प्रमोद शिनगारे, श्री. सचिन वावधाने, शैला महाजन व ज्योती कदम उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांपैकी विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरव करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास झळकत होता.

 

दुसऱ्या सत्रामध्ये शिशुगट, बालवाडी व पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचे घटक चाचणी क्रमांक १ मधील पेपर पालकांना दाखवण्यात आले. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत वर्गशिक्षक व विषय शिक्षकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधत पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन घेतले. पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ मिळाले.

 

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे व इतर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे व प्रोस्ताहीत करणे हा होता तसेच विद्यार्थी – शिक्षक – पालक समन्वयातून शिक्षण प्रक्रिया सकारात्मक बदल घडवणे हा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने हाच या सोहळ्यामगचा उद्देश आहे असे मनोगत विद्यालयाचे मुख्यद्यापक सुरवसे व्ही. एन यांनी व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुंजाराम निरडे यांनी केले. प्रस्ताविक श्री. सचिन चव्हाण यांनी केले तर आभारप्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विठ्ठल सुरवसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

धारूरमध्ये शेतकरी लाईटला त्रस्त; क्रेशरवाल्यांचा ‘ओव्हरलोड’ तर अधिकारी बेफिकीर! शेतकऱ्यांचा प्रश्न कोण ऐकणार?

मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल: जाहिरातबाजीवर तिखट टीका

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम संघटनेच्या शहराध्यक्षपदी सय्यद सादिक यांची निवड

Leave a Comment