बीड पेंडगावच्या मारुतीचे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक;सहा तरुणांचा मृत्यू
बीड,प्रतिनिधी l बीड शहरापासून काही अंतरावर असलेले पेंडगाव येथे हनुमान मंदिर आहे. या जागृत हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी बीड शहरातून जाणाऱ्या सहा युवकांवर काळाने घातला आहे.
रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या या बीड शहरातील युवकांना एका कंटेनर ने चिरडले आहे यात धडकेत चार जणांच्या जागीच मृत्यू झाला तर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. असे एकूण सहा जणांना आपला जीव गमावा लागला.
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर नामलगाव फाटा परिसरात शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. पेडगावच्या मारुतीचे दर्शनासाठी निघालेल्या सहा पादचाऱ्यांना भरधाव कंटेनरने चिरडले. अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये दिनेश दिलीप पवार (२५), पवन शिवाजी जगताप (२५), अनिकेत रोहिदास शिंदे (२५), किशोर गुलाब तावरे (२४), विशाल श्रीकृष्ण काकडे (२३), आकाश अर्जुन कोळसे (२५) यांचा समावेश आहे. सर्वजण बीड शहर व परिसरातील रहिवासी असून शनिवारी पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी निघाले होते.
पहाटे सुमारास एन.एल.०१ ए.जी.३१९७ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सहा युवकांचा नाहक मृत्यू झाला. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट कोसळून दुःखाचा डोंगर त्यांच्या नातेवाईकांवर पसरला असून, निष्काळजीपणे कंटेनर चालका विरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांमध्ये होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक जाम झाली होती. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, महामार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कधी होणार? मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्घटनेमुळे पूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.