मराठा मोर्चात दु:खद घटना ! कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू, मनोज जरांगेंनी व्यक्त केली हळहळ
मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले असून आज ते जुन्नर येथे दाखल झाले.
आंदोलनादरम्यान जुन्नरमध्ये बीडच्या सतीश देशमुख या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी हळहळ व्यक्त करून कार्यकर्त्यांना धीर दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. २७ ऑगस्टला ते अंतरवाली सराटीतून निघाले. आज २८ ऑगस्ट रोजी ते पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. दरम्यान जुन्नरमध्ये पोहोचताच एक दु:खद घटना घडली. एका मराठा आंदोलकाचा हृदयवविकारामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा कार्यकर्त्यांसह जुन्नर मुक्कामी होते. सकाळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माध्यमांशी संवादही साधला यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान मनोज जरांगे यांच्यासोबत असलेला कार्यकर्ता सतीश देशमुख याला हृदयविकाराचा झटका आला, त्याला तातडीने जुन्नरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सतीश देशमुख हा बीडच्या केज तालुक्याली वरगावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर जरांगे पाटील यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यातील ६४ जणांचे बलिदान
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सर्वाधिक बलिदान देणारा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची नोंद आहे. आतापर्यंत ६४ लोकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिले आहे. आजही मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात कायम सक्रीय असलेल्या सतीश ज्ञानोबा देशमुख (वय ४४) या बीड जिल्ह्यातील व्यक्तीचा ऱ्हदयविकाराने मृत्यू झाला.
सतीश देशमुख यांचे वडिल ज्ञानोबा व भाऊ व्यंकटेश दोघेही सैन्य दलातून निवृत्त असल्याने लढाऊ बाणा त्यांच्या घरातच आहे. सतीश देशमुख मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. दोन वर्षांपासून प्रत्येक आंदोलात सतीश देशमुख हिरीरीने सहभागी होते.. दरम्यान, मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी काल बुधवारी (ता. २७) सतीश देशमुख हे गावातील सहकाऱ्यांसह पिकअप वाहनाने रवाना झाले. जरांगे यांच्या ताफ्यासोबतच त्यांचे वाहन होते. आज सकाळी नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे त्यांना ऱ्हदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडिल व भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी २०१८ पासून जिल्ह्यातील ६४ समाज बांधवांनी आरक्षण मागणीसाठी बलिदान दिल्याची नोंद सरकारी दफ्तरी आहे. सतीश यांचे बंधू व्यंकटेश देशमुख यांनीही पुण्यात आंदोलनासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत
प्रश्न 1: मनोज जरांगे पाटील सध्या कुठे आंदोलन करत आहेत?
ते अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले असून सध्या जुन्नर मार्गावर आहेत.
प्रश्न 2: मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आणि गाव कोणते?
कार्यकर्त्याचे नाव सतीश देशमुख असून तो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरगावचा रहिवासी होता.
प्रश्न 3: मृत्यूचे कारण काय होते?
हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
प्रश्न 4: मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी हळहळ व्यक्त केली आणि आंदोलनकर्त्यांना धीर दिला.
प्रश्न 5: आंदोलनाचा मुख्य उद्देश काय आहे?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच मुख्य मागणी आहे.