बीड प्रतिनिधी l दिनांक 9 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास परिसरातील व्यापारी, नागरिक, स्थानिक जनता, दुकानदार, पांगरी रोड रहदारी करणारे ग्रामीण लोकांच्या वतीने व दत्ता सुदाम गायकवाड मा. नगरसेवक यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
आणि सम्राट चौक या ठिकाणचा रस्ता झालेला नाही त्यामुळे वरील परिसरात व्यापारी, स्थानिक जनता, दुकानदार पांगरी रोड रहदारी करणारे ग्रामीण लोकांच्या वतीने व दत्तात्रय गायकवाड मा. नगरसेवक या सर्वांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले व प्रशासनाच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या.
सम्राट चौकातला रस्ता लवकरात लवकर करून घ्यावा असे आव्हान देण्यात आले अन्यथा याच्यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असे सर्व नागरिक व्यापारी स्थानिक जनता व दत्ता गायकवाड माजी नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने लोक जमा झालेले दिसून आले.