28 C
New York
Thursday, July 10, 2025

Buy now

spot_img

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने केला सन्मान

 

 

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने केला सन्मान

बीड। प्रतिनिधी
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा पत्रकारांचा संघ असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो तर ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कतुत्वान महिलांचा नारी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते याच धर्तीवर गेल्या दोन वर्षीपासून दर्पण दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ पत्रकारांना आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात येते याच अनुषंगाने बीड येथे मंगळवार दि ८ एप्रिल रोजी मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांना आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

दर्पण दिनानिमित्त आष्टी तालुक्यातील सर्व जेष्ठ पत्रकार यांना सन्मानित करण्यात आले होते याचं अनुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम एस सर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे राज्यपातळीवर काम करत आहेत व पत्रकारांच्या प्रश्नांनावर आवाज उठवित आहेत आणि आंदोलने व लेखणीच्या माध्यमातून गोर गरीब सर्वसामान्य पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र तत्पर असतात व सरकार पर्यंत पत्रकारांच्या व्यथा पोहचविण्याचे काम करत असल्याने त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आली आणि मंगळवारी बीड येथे मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत औचित्य साधून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांना गौरविण्यात आले.यावेळी जेष्ठ संपादक संपादक अनिल फळे, जेष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर ,डिजिटल मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे,जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर,जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, विभागीय सचिव रवी उबाळे,संजय हंगे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत, जिल्हा उपाध्यक्ष जुनेद बागवान, चंद्रकांत राजहांस,कादर मकरानी,मधुकर तौर, हमिदखान पठाण, प्रचंड सोळंके,अनिल अष्टपुञे, पत्रकार सोपान पगारे, मारूती संत्रे आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

ads

Related Articles

ताज्या बातम्या