बीड प्रतिनिधी l
सुप्रसिद्ध असे मुळगाव परळी तालुक्यातील वानटाकळी रहिवासी असणारे धारूर शहरात गेले 40 वर्षापासून रुग्णसेवेत रुजू असणारे नामांकित असे डॉक्टर ज्ञानोबा(बापू) नरहरी मुंडे यांचे अवघ्या 63 व्या वर्षी दिनांक 16 मार्च 2025 रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. या दुःखद निधनाबद्दल धारूर तालुक्यात व परळी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉक्टर ज्ञानोबा मुंडे (बापू)हे धारूर तालुक्यात सर्वपरिचित असे होते त्यांनी आज पर्यंत हजारो रुग्णावर अल्प दरात उपचार केले आहेत. त्यांच्या हातून कित्येक रुग्णावर उपचार करून त्यांनी एक प्रकारे जीवदान दिले आहेत. डॉक्टर मुंडे(बापू) यांच्या अचानक जाण्याने पूर्ण धारूर तालुक्यासह परळी तालुका पोरका झाला आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या या दुःखद निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉक्टर ज्ञानोबा मुंडे(बापू) हे नावलौकिक असे होते त्यांच्या कुटुंबासह सर्व तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या अंत्यविधी मूळ गावी म्हणजे परळी तालुक्यातील वानटाकळी येथे दिनांक 17/ 3 /2025 रोजी सोमवार सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे, चुलते, असा मोठा परिवार त्यांचा आहे.
त्यांच्या दुःखात दैनिक अक्षरवार्ता परिवार व हंगे परिवार सहभागी आहे.