बीड दि.६ (प्रतिनिधी):- बीडच्या एमआयडीचा विकास व्हावा याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून आ.संदीप क्षीरसागर शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यातच गुरूवारी (दि.६) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधीमंडळात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली.
बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा याकरिता बीड शहरात स्थित असलेल्या औद्योगिक वसाहतीचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून त्याठिकाणी मोठमोठे उद्योग येतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल तसेच आर्थिक स्थिती सुधारेल. ही बाब लक्षात घेऊन आ.संदी प क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या एमाआयडीसीच्या विकासासाठी पाठपुरावा करत आहेत. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक अधिकारी आदी वरिष्ठ अधिकार्यांसमवेतही बैठका घेतल्या होत्या.
पीआता पुन्हा यासंदर्भात, मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली आहे. दरम्यान याविषयी ना.सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सविस्तर बैठक लावण्याचे सांगितले आहे.