दुर्दैवी घटना रस्त्यावर पडला रक्त-मासांचा सडा
बीड प्रतिनिधी l बीड शहरानजीक असणाऱ्या घोडका राजुरी फाटा रोडवर एक भयानक अशी दुर्घटना घडली आहे. पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना भरधाव बसने चिरडलं आहे. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी धरून, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये १) सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०) २) विराट बब्रूवान घोडके (१९) ३) ओम सुग्रीव घोडके (२०) यांचा मयतामध्ये समावेश आहे.
या तरुणांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.