24.2 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img

व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला… पहा कुठे घडली घटना

व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ल

अंबाजोगाई प्रतिनिधी l दिवसभराचे काम आटोपून घराकडे निघालेल्या तरुण व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना अंबाजोगाई शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर बुधवारी (दि.१५) रात्री ९ वाजता घडली.

 

सुजीत श्रीकृष्ण सोनी (रा. अंबाजोगाई) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीत सोनी दिवसभराचे कामकाज आटोपून दुचाकीवरून घराकडे निघाले होते.

 

ते शासकीय विश्रामगृहासमोर आले असता अनोळखी तीन व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. सुजीत यांनी कसेबसे हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवून दुचाकीवरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या सुजीत सोनी यांच्यावर अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

दरम्यान, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी कोणत्या कारणास्तव हल्ला केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन तपास सुरू केला आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या