परळी (प्रतिनिधी) परळीचे भूमिपुत्र तथा छत्रपती संभाजी नगर आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास सोपानराव मुंडे IRS यांचे प्रमोशन होऊन आता आयकर आयुक्त, पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे.आता पुण्याची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे .
विश्वास मुंडे IRS बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कनेरवाडी चे भूमिपुत्र आहेत.
विश्वास मुंडे IRS यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी ता. परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे झाले व Graduation:B Tech (chemical) रासायनिक अभियांत्रिकी नागपूर येथे झाले आहे.
UPSC संपुर्ण देशात 223 रॅक (बॅच:2007 )भारतीय राजस्व सेवा (India Revenue service IRS ) आता त्यांचे आयकर आयुक्त पुणे येथे प्रमोशन झाले आहे.
विश्वास मुंडे IRS यांनी सेवेत आल्यानंतर जळगाव, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई आणि पुणे आयकर आयुक्त , पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे आयकर विभागात चोखपणे काम करून त्यांनी आपल्या याच कामातून कर्तव्यपणा सिद्ध करून दाखवला आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांची छत्रपती संभाजीनगर आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती .याही ठिकाणी त्यांनी अगदी चोखपणे कर्तव्य निभावले होते. आता त्यांच्यावर पुण्याची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुणे येथे आयकर आयुक्त पदावर ते आता काम पाहणार आहेत त्यामुळे याही ठिकाणी अगदी चोखपणे ते कर्तव्य निभावतील असा विश्वास प्रत्येकाला आहे .त्यांची पुणे आयकर आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.