नवनित कॉवत बीडचे नवीन पोलिस अधीक्षक बीड.
बीड प्रतिनिधी – जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे राज्यभरात बदनाम झालेल्या बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीचा उद्रेक रोखून जनसामान्यामध्ये पोलिसांबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान नवनीत कॉवत यांच्या समोर असणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आता आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे
*कोण आहेत नवनीत कॉवत?*
नवनीत कॉवत हे २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते.