देशातील पत्रकारांची सर्वात मोठी
आणि
सर्वात जुनी पत्रकार संघटना
असलेली *मराठी पत्रकार परिषद* उद्या 86 व्या वर्षात पदार्पण करीत आहे..
देशातील अनेक राज्यात आणि महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि सर्व म्हणजे 354 तालुक्यात शाखा विस्तार असलेली परिषद ही देशातील एकमेव पत्रकार संघटना आहे..
देशभरातील 10,000 पेक्षा जास्त मराठी पत्रकार सदस्य असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले..
पत्रकार संरक्षण कायदा,
पत्रकार पेन्शन योजना,
पत्रकार आरोग्य योजना
आणि बरेच…
पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी परिषद गरजू पत्रकारांना मदत करण्यास कायम पुढे असते..
अशा संघटनेचे,
मराठी पत्रकार परिषदेचे आम्ही सदस्य आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..
मराठी पत्रकार परिषदेच्या 86 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
*मराठी पत्रकार परिषद चिरायू होओ*..
*एस.एम देशमुख*