बीड (प्रतिनिधी):- मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदशनाखाली आणि बीड जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आज बीड जिल्हा रुग्णालयात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
या शिबिराला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरामध्ये पत्रकारांसह संगणक चालक, यंत्रचालक वृत्तपत्र विक्रेते यांच्याही आरोग्याचे तपासणी करण्यात येणार आहे आपल्या कुटुंबीयांसह या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे संभाजीनगर विभागाचे समन्वयक सुभाष चौरे ,राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हंगे, जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे, बीड तालुका अध्यक्ष दत्ता आजबे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमान्यु घरत,तालुका समन्वयक लक्ष्मण नरनाळे, तालुका निमंत्रक मंगेश नेटुरकर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सुदाम चव्हाण आदींनी केले आहे.
पत्रकारांचे आरोग्य शिबीर सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी दिली. या संदर्भात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांची भेट घेवून या शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने महाराष्ट्रभर 3 डिसेंबरला दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात पत्रकार, संगणक चालक, यंत्रचालक, वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी केली जाईल.
या अनुषंगाने हे शिबीर बीड जिल्हा रुग्णालयात सकाळी 9 ते 3 दुपारी या वेळेत होणार असून या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक चिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांना पत्र देण्यात आले. या शिबीरामध्ये रक्तदाब, मधुमेह, इसीजी, रक्तगट आदींसह पत्रकारांच्या कुटूंबीयांसाठी महिला आरोग्य अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
या शिबीराचा बीड तालुक्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन संभाजीनगर विभागीय समन्वयक सुभाष चौरे, परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा परिषदे प्रमुख संजय हंगे ,जिल्हा उपाधयक्ष रवी उबाळे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यु घरत, संपादक राजेंद्र होळकर, हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका निमंत्रक मंगेश निटुरकर, समन्वयक लक्ष्मण नरनाळे, बीड तालुकाध्यक्ष दत्ता आजबे, कार्याध्यक्ष रेहान शेख, कोषाध्यक्ष प्रशांत लहुरीकर, सरचिटणीस प्रचंड सोळंके वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सुदाम चव्हाण आदींनी केले आहे.