---Advertisement---

डॉ. महावीर धर्मराज सोनवणे यांच्या रोड रोलरला मतदारांची पसंती

On: November 12, 2024 3:56 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

 

केज विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. महावीर सोनवणे विजयी होणार-भगवंत आप्पा वायबसे

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मस्साजोगचे भूमिपुत्र डॉ. महावीर धर्मराज सोनवणे यांच्या रोड रोलरला दिवसांनी दिवस केज मतदार संघात मतदारांची पसंती मिळत आहे. डॉ. महावीर सोनवणे यांनी प्रचारामध्ये भरारी घेतली आहे.

 

केज विधानसभेची निवडणूक ही तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
केज विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. महावीर सोनवणे यांचाच विजय होणार आहे असे माध्यमाशी बोलताना भगवंत आप्पा वायबसे यांनी म्हटले आहे.

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, २०२४ च्या केज विधान सभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

केज विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष तथा मित्र पक्ष, व विविध सामाजिक संघटनेचे,फुले-शाहू आंबेडकर चळवळीतील बौद्ध उमेदवार डॉ. महावीर धर्मराज सोनवणे हे देखील आहेत.

 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात असून प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह डॉ. महावीर सोनवणे यांनी देखील प्रचारांमध्ये आघाडी घेतली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. सोनवणे यांना केज मतदार संघातील मतदाराकडून दिवसांनी दिवस पसंती मिळत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.

 

डॉ. महावीर सोनवणे हे त्यांच्या कार्यकर्ते व मित्र परिवारासह सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मतदार संघातील गावोगावात जाऊन मतदारांशी संवाद साधून गाठीभेटी घेत आहेत. विद्यार्थी महिला शेतकरी युवक नागरिक यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळे सोनवणे यांना मतदारांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

 

डॉ. महावीर सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून भगवंत आप्पा वायबसे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून डॉ. महावीर सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर घेऊन काम करत आहेत.

 

माध्यमाशी बोलताना भगवंत आप्पा वायबसे म्हणाले की, केज मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गाला गेल्या अनेक वर्षापासून राखीव आहे परंतु या मतदारसंघांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षांनी दलित उमेदवार दिलेला नाही. डॉ. महावीर सोनवणे हे दलित समाजाचे व या मतदारसंघाचे भूमिपुत्र आहेत डॉ. सोनवणे यांना डावी आघाडीसह दलित चळवळीतील विविध संघटनेने पाठिंबा दर्शविलेला आहे व सर्व एकदिलाने एकजुटीने डॉ. महावीर सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत.

 

पुढे बोलताना वायबसे म्हणाले की.डॉ.महावीर सोनवणे यांची ही निवडणूक नसून या मतदारसंघातील बहुजनाची लढाई आहे या लढाईमध्ये सर्व बहुजन समाज एकत्र होऊन ही निवडणूक लढवीत आहे म्हणून महावीर सोनवणे यांचा विजय हा निश्चित आहे येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी त्यांनाच गुलाल लागणार आहे असे मध्यमाशी बोलताना वायबसे यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. महावीर सोनवणे यांनी प्रचारामध्ये भरारी घेतली असून व त्यांना मतदार संघामध्ये दिवसाने दिवस मतदारांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले आहे अशा चर्चा जनसामान्यातून ऐकण्यास मिळत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

धारूरमध्ये शेतकरी लाईटला त्रस्त; क्रेशरवाल्यांचा ‘ओव्हरलोड’ तर अधिकारी बेफिकीर! शेतकऱ्यांचा प्रश्न कोण ऐकणार?

मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

उद्धव ठाकरे ठाण्यात येणार: अनंत तरे चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर बोलणार?

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल: जाहिरातबाजीवर तिखट टीका

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

Leave a Comment