किल्ले धारूर/प्रतिनिधी
उच्च शिक्षित, प्रशासकीय सेवेचा अनुभव,विकास कामांची जाणीव,स्वच्छ प्रतिमा व सर्व सामान्यांना आपलेसे वाटणाऱ्या प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांना माजलगाव विधानसभा निवडणूकीत आपणास राष्ट्रवादी कॅांग्रेस- शरदचंद्र पावर पक्षाचे तिकीट मिळेल या अपेक्षेने निवडणूकीपूर्वीच माजलगाव मतदार संघ पिंजून काढला परंतू पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही.
आपणास असलेला सामान्य जनतेचा पाठींबा हेच आपले तिकीट असून मी अपक्ष..सामान्य जनता हाच आपला पक्ष म्हणत प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांनी आई- वडील व महा पुरूषांचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करून जन संवाद दौरा चालूच ठेवला आहे.
दिपावली पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर दि.२ नोव्हेंबर २०२४ शनिवार रोजी धारूर तालुक्यांतील प्रसिध्द जागृत देवस्थान श्री बोंबल्या मारुती या देवस्थान चे दर्शन घेऊन आसरडोह,उमरेवाडी,रूई,अंजनडोह, आसोला, गोपाळपूर,किल्ले धारूर,चिंचवण, बुरूजदरा व वडवणी शहर असा जन संवाद दौरा करून आपण बीड जिल्हा परिषदेत शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी पदावर नौकरी करून स्वेच्छा सेवा निवृत्त घेतलेली असून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत मागील १० वर्ष जनतेची सेवा केलेली आहे.
आपण सामान्य जनतेचे सुख,दु:ख,अडी अडचणी,शासकीय कामात मदत,नैसर्गिक अपत्तीत मदत,आरोग्य सेवा, दवाखान्यातील रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्न छत्र,अनाथ-निराधारांचे मोफत शिक्षण,युवकांना नौकरी व रोजगार मार्गदर्शन,यशवंत-गुणवंतांना प्रोत्साहन, दुष्काळी परिस्थीत पाणी फाउंडेशन सोबतचे काम,शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने,अध्यात्मिक क्षेत्रातील जन संपर्क,जनतेसाठी धारूर येथील जन संपर्क कार्यालय या माध्यमातून जन सेवा केलेली आहे.
या मुळे आपणास जनतेचा पाठींबा व आशिर्वाद आहेत याच्याच जोरावर आपण माजलगाव विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असून जिंकणार आहोत तरी सुजान मतदारांनी मतदान रूपी आशिर्वाद देवून मला सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करत ईश्वर आनंदराव मुंडे हे जन संवाद दौरा करत आहेत.त्यांच्या दौऱ्यास जनतेचा चांगला पाठींबा मिळत आसल्याचे दिसत आहे.