19.4 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img

स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 10,35,520/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

बीड प्रतिनिधी। विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुशंगाने यूसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत कळंब- अंबाजोगाई रोडवर आंतरजिल्हा स्थिर सर्व्हेक्षण पथकाची नेमणूक महामार्गावरील वाहनांची तपासणी करण्याकरिता केली असून या ठिकाणी महसूल व पोलीस विभागांचे संयुक्त पथक 24 तास कार्यरत आहेत.

 

यादरम्यान दि. 28/10/2024 रोजी दुपारी 15.20 वा. चे सुमारास वाहन तपासणी करत असताना पथकास कृष्णा तुकाराम कोल्हे व बळीराम त्रिंबक कोल्हे दोघे रा. नायगाव, ता. केज, जि. बीड हे दोघेजण स्कॉर्पिओं वाहन क्र एम एच 44 झेड 1563 मधून अवैध दारू वाहतूक करत असताना मिळून आले.

 

सदर वाहनात एकुण 35,520/- रूपयांची विदेशी दारूचे व बिअरचे एकुण 05 बॉक्स ताब्यात घेऊन  युसूफ वडगाव पोलीस ठाणे येथे मद्यनिषेध कायदयान्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून या गुन्हयात स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 10,35,520/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थिर सक्षण पथकातील पोहवा 1483 सत्यपाल कांबळे, पोशि/916 अविनाश मोकाशे, पोशि 1914 पठाण, श्री एम. पी. बोधीकर, श्री आर के. हारे, श्री यु. ए. माळी यानी केली आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या