बीड प्रतिनिधी- जिल्हा रुग्णालयातील वाढती ऋण संख्या पाहता. दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात येत आहे जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया ही दैनंदिन होत आहेत. आपत्कालीन अपघात विभाग, शस्त्रक्रिया विभाग,त्याचबरोबर जिल्हाभरातून हेमोफिलिया, थैलेसिनियाचे काही बाल रुग्ण सुद्धा आहेत त्यांना आठवड्याला पंधरा दिवसाला रक्त द्यावाच लागत, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दिवसा काठी 40 ते 45 रक्त बॅग पुरवठा रुग्णांना केला जातो.
सध्याच्या स्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात रक्तपुरवठा विभागात कोणत्याच गटाचे रक्त शिल्लक नाही. त्यामुळे मोठा तुटवडा सध्या पाहायला मिळत आहे .
जिल्हाभरातील रक्तदात्यांनी पुढे यावं आणि रक्तदान द्यावं असा आव्हान जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात करण्यात केले आहे.
सर्वांनी सामुदायिक दायित्व, समाज हित, जोपासलेला हा बीड जिल्हा आहे
त्यामुळे प्रत्येकाने पुढे यावं आणि रक्तदान करावं जेणेकरून आपण एखाद्याचा जीव वाचू शकतो. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान . आपण नेहमीच म्हणतो आणि ऐकतो मात्र या वेळेस आपण नक्कीच रक्तदान करा. अस आव्हान जिल्हाभरातील नागरिकांना करण्यात येत आहे .