- बीड (प्रतिनिधी)दि.६ : बीडमध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कल्पतरू प्रतिष्ठानच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, कल्पतरूच्या सचिव डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळ लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयार असून गणरायाचे आगमन एका दिवसावर येऊन ठेपले आहे. यावर्षी कल्पतरू प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आकर्षक देखावे साकारणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास १ लाख १ हजार, द्वितीय क्रमांकास ५१ हजार आणि तृतीय क्रमांकास ३१ हजार इतक्या रक्कमेचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान, उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, व्यंकटेश वैष्णव, प्रा.संजय पाटील देवळाणकर, प्रा.सारंग वाघमारे, फामजी पारीख, विद्याभूषण बेदरकर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी नोंदणीसाठी श्रीमंत तोंडे 8329259295 व नागेश शेटे 7057026877 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.