बीड, प्रतिनिधी । महाराष्ट्र
ही संतांची भूमी मानली जात आहे, त्यामुळे या भूमीला संत परंपरेच अनुष्ठान लाभलं संत परंपरेमुळे महाराष्ट्रासह देशभरात भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला आहे.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सोपानदेव, संंत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सावता माळी अशा विविध संतांनी संस्कार आणि नीतीचे शिक्षण दिले.
अखंड हरीनाम सप्ताहातून सतसंग लाभतो, नामस्मरणाची आवड निर्माण होते. खऱ्या अर्थाने अध्यात्माची गोडी वाढते. सुसंकृत समाज व्यवस्थेसाठी अखंड हरिनामाची गरज आहे.
असे विचार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सोमनाथवाडी येथील २५ व्या अखंड हरीनाम सप्ताह सांगता प्रसंगी व्यक्त केले. काल बीड विधानसभा मतदारसंघातील मौजे सोमनाथवाडी येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. अर्जुन महाराज शिंदे यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के याप्रसंगी उपस्थित राहुन महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत, उपस्थित भाविक भक्तांना संबोधित करून नाम सप्ताहाचा लाभ घेतला. यावेळी समवेत बेलेश्वर संस्थांचे मठाधिपती महंत श्री महादेव महाराज भारती, सरपंच किशोर शेळके, श्री उद्धव जाधव, सचिन मस्के यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक संखेने उपस्थित होते.