प्रतिनिधी:-
बीड शहरातील सुप्रसिद्ध असणाऱ्या ट्विंकलिंग स्टार स्कूल येथे दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी स्कूलचे अकॅडेमिक डायरेक्टर श्री कोमाथ भास्करन, प्राचार्या जयश्री कदम, उपप्राचार्य दीपक झा, उपप्राचार्य कृष्णनकुमार, परिवेशिका स्वाती राठोड , शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आज शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात जन्माष्टमीचा सोहळा पार पडला.
श्रीकृष्णची वेशभूषा करत शाळेत आलेल्या मुलांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.
शाळेत दही हंडीची जय्यत तयारी करण्यात आली होती.
यावेळी मुलांनी तीन थर लावत उत्साहाने दही हंडी फोडली. दहीहंडी फोडल्याचा उत्साह या मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.
ट्विंकलिंग स्टार स्कूल येथे श्रीकृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी बांधून मानवी मनोरे तयार करून फोडण्यात आली. ‘हाथी घोडा पालखी…जय कन्हैयालाल की’, ‘गोपाल कृष्ण भगवान की जय’ या जयघोषात स्कूल परिसर दणाणून गेला होता. प्राचार्या जयश्री कदम यांनी विद्यार्थांना गोकुळ अष्टमीचे महत्त्व सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी प्राची थोरातने केले तर आभार प्रदर्शन श्रेया शिंदेने केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृता जव्हेरी, योगिता वाघमारे , वृषाली खोजे , प्रणिता घोडके , मीनल मिश्रा , गौरी कुलकर्णी , कीर्ती जोशी, अशोक चौरे , युवराज खाडे, मिराज शेख, दिनेश ढाकणे, प्रेम वाघमारे, अतुल पिलाकल, पुष्पा पवार, प्रकाश मस्के, अविनाश बेद्रे आदींनी पुढाकार घेतला.