4.3 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img

हनुमानवस्ती-जिवाची वाडी रस्ता अतिक्रमण काढण्यास प्रशासन मुग गिळून गप का ?

येवता: रोजी.केज तालुक्यातील जिवाची वाडी तहत हनुमानवस्ती वरील लोकांची तिन वर्षा पासुनची रस्त्याची मागणीचे भिजत घोंगड कायम तसेच रस्त्याची मागणी ग्रामपंचायत कार्यालय,जिवाची वाडी,वस्ती वरील शेतकरी,जिल्हा परिषद शाळा यांनी गेल्या तिन वर्षा पासुन करत आहेत,तहसीलदारांनी चार वेळा स्थळ पाहाणी केली,सुनावणी घेऊन निकाल दिला निकाल लागुन ही आठ महिने झाले परंतु विडा मंडळ अधिकारी सुहास डोरले रस्ता कामास विरोधकांशी संगणमत करुण तत्कालीन तहसीलदार,दुल्हाजी मेंडके,खंडागळे साहेब,अभिजीत जगताप,सचीन देशपांडे यांच्या कारकिर्दीत पण रस्ता प्रश्न सुटलाच नाही.दि.१६ रोजी मंडळ अधिकारी विडा यांना रस्ता खुला करण्याचे आदेश मंडळ अधिकारी विडा यांना असलेने श्रीमीती आशा वाघ नायब तहसीलदार, केज.उत्रेश्वर घुले तलाठी जिवाची वाडी,भूमिअभिलेख केज चे रविंद्र विभूते,केज पोलीस ठाणे चे राजु वंजारे जायमोक्या वर आले असताना त्यानी त्यांच्या कर्तव्यात कसुर केलेचे दिसत आहे .

१)शेतकऱ्यांची मागणी नकाशा वरील शासकीय रस्त्याची आहे.

२)तत्कालीन तहसीलदार अभिजित जगताप यांनी मनमानी ?त्यांनी त्यांची हुशारी दाखवत शासकीय नकाशा वरील रस्ता सोडून पर्यायी रस्त्याचा निर्णय घेतला.

३)निर्णय नदीच्या साईट(बाजुने) निकाल दिला,मात्र विडा मंडळ अधिकारी सुहास डोरले विरोधककांशी संगणमत करून नदीपात्रात रस्ता करण्यासाठी स्थानी पुढाऱ्यांशी हितगुज करत आहेत.

४)सुहास डोरले यांना वरिष्ठांनी बोलाऊन घेऊन रस्ता करण्याच्या सूचना देऊनही दुरलक्ष करतात.

५)डोरले हे स्थानीक पुढाऱ्यांच्या दबावाखाली आहेत ?त्यांच्या ऐवजी खास बाब म्हणून नविन कर्तव्यदक्ष अधिकारी यांची रस्ता कामासाठी नियुक्ती करावी.

६)मा.उप जिल्हाधिकारी,अंबाजोगाई,दिपक वजाळे यांच्याकडून रस्ता प्रकरण निकाली काढण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा …

ads

Related Articles

ताज्या बातम्या