राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैजनाथ
बीड दि. 24 ( जिमाका ) :- आवाकॅडो हा शब्द शेतकऱ्यांमध्ये आता प्रचलित होत आहे याची सर्वप्रथम शेती करून संपूर्ण राज्यात पहिले उत्पादन घेण्याचा मान बीडचा शेतकऱ्याचा आहे हे परळी वैजनाथ येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवातील प्रदर्शनाच्या निमित्ताने समोर आले आहे.
नव्या युगात नाविन्यपूर्ण शेती ही आता काळाची गरज बनली आहे शेतकऱ्याला पारंपरिक शेतीमध्ये मिळणारे उत्पन्न आणि फळ शेतीमध्ये मिळणारे उत्पन्न यात प्रचंड तफावत आहे. फळ शेतीमध्ये एकदाच लागवड करून अनेक वर्ष त्यावर उत्पादन घेण्यात ण्यात यश येते आणि परिणामी उत्पादन खर्च कमी होत जात उत्पन्न वाढीची शक्यता जास्त असते याच भूमिकेतून आता शेतकरी फळशे तिकडे वळताना दिसत आहे कमी पाण्याच्या जागा हे शेतीसाठी काम आव्हान असतं याच प्रकारे बीड जिल्ह्यातील आव्हान लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील शिवनी येथील परमेश्वर थोरात या युवा शेतकऱ्याने खरोखर एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर उभा केला आहे.
स्वतः बी ए चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देखील शेतीकडे वळलेल्या परमेश्वर थोरात यांनी इंटरनेटच्या आधारे आवाकॅडो शेतीची माहिती घेतली.
2018 साली परमेश्वर थोरात यांनीआवाकॅडो ची लागवड प्रथम केली या लागवडीसाठी साधारणपणे जून जुलै हा चांगला काळ असतो साधारण दोन ते अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पिकाचे फ्लॉवरिंग होतं व त्यानंतर जून जुलै च्या आसपास याला फळ येतात.
मध्यंतरीच्या कोरोना कालावधीनंतर आरोग्याबाबतची जागरूकता वाढली आहे त्यासोबतच स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देताना त्याची निकड लक्षात घेऊन फळांचे सेवन देखील वाढले आहे त्यामध्येआवाकॅडो या फळाची अधिक मागणी बाजारात दिसून येते. वाशी मार्केट असो किंवा पुणे मार्केट या ठिकाणी या फळाला चांगल्या प्रकारे मागणी आहे व ही फळे साधारणता मॉल मधून विकली जातात एका फळाची किंमत साधारण दीडशे ते दोनशे रुपये असून याला मोठी मागणी असल्याने त्याचे भाव स्थिर आहेत.
आवाकॅडो शेती करून एकरी दीड ते दोन टन इतके तरी उत्पादन वर्षाला निघाले तर अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते व तसे उत्पन्न या शेतकऱ्याने मिळवले.
या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर याचं आयुष्यमान पन्नास वर्षे असल्याने पुढील पन्नास वर्षे फक्त पीक जपणूक आणि मार्केटिंग याकडे लक्ष देत आपले उत्पन्न वाढवणे शक्य होणार आहे याचा आनंद या शेतकऱ्याने व्यक्त केला.
आवाकॅडो बाबत माहिती सांगताना थोरात म्हणाले की हे मूळ अमेरिका मधील उत्पादन आहे मेक्सिको विद्यापीठात याची प्रथम लागवड करण्यात आली होती कर्नाटक मधील एसरघट्टा येथे पंधरा वर्षांपूर्वी याची लागवड सुरू झाली व हळूहळू याचा प्रसार वाढत आहे खात्रीशीर पैसे मिळवून देणारे रोग पीक म्हणून याकडे शेतकरी आता बघत आहेत साधारण एकरी हजार फळे जरी निघाली तरी दीडशे ते दोनशे रुपये प्रतिफळ या हिशोबाने बाजारात याची विक्री करणे शक्य आहे त्यामुळे साधारणपणे कमी पाऊस असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांसाठी ही शेती वरदान ठरणारी आहे.