---Advertisement---

सोन्याचा भाव ऐतिहासिक उच्चांकावर, ‘इतकी’ झाली किंमत

On: March 21, 2024 7:58 AM
Follow Us:
---Advertisement---

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६७,००० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६५,९६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७६,६३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६१,३०७ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,८८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,३०७ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,८८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,३०७ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,८८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,३०७ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,८८० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

धारूरमध्ये शेतकरी लाईटला त्रस्त; क्रेशरवाल्यांचा ‘ओव्हरलोड’ तर अधिकारी बेफिकीर! शेतकऱ्यांचा प्रश्न कोण ऐकणार?

मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

उद्धव ठाकरे ठाण्यात येणार: अनंत तरे चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर बोलणार?

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल: जाहिरातबाजीवर तिखट टीका

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

Leave a Comment