---Advertisement---

पालीच्या घाटात कोळवाडीजवळ दोन गाड्यांचा अपघात होऊन डिझेलच्या टँकरचा स्पोट

On: February 28, 2026 5:21 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड (प्रतिनिधी)- बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजसुंभा घाट पालीपासून जवळ असलेल्या कोळवाडी गावाजवळ डिझेलच्या टँकरचा स्पोट होऊन पेट घेतल्याची घटना दि.१२ डिसेंबर शुक्रवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडली आहे. रस्त्यावर वेगात असलेल्या टँकरने व दुसरी गाडीचा अपघात होऊन टँकर पलटी झाल्याने स्पोट झाला आणि मोठ्या प्रमाणात पेट घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर सर्व ट्रॅफिक जाम होऊन टँकर मधील डिझेल जितपर्यंत पसरले जात होते तिथपर्यंत मोठ्या प्रमाणात पेट दिसत होता.
ग्रामीण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल

आज म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी घेऊन येणारे टँकर पाली घाटा जवळील कोळवाडीजवळ आल्यानंतर अपघात होऊन टँकरचा स्पोट झाला व पेट घेतला. दोन गाड्यांचा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी समजते या कारणातून टँकरला आग लागली होती. रस्त्यावर धावत्या टॅक्टरने पेट घेतल्याने खळबळ उडाली आणि टँकर डिझेलचे असल्याने स्फोट होऊन गाडी जळून खाक झाली. या गाडीचा चालक देखील या गाडीतून बाहेर आल्याचे प्रत्यक्ष कडून सांगण्यात येत आहे. या आगीत परिसरातील रस्त्यावर असलेल्या झाडांना सुद्धा या आगीचा मोठा फटका बसला असून झाडे पेटली आहेत. सध्या घटनास्थळी ग्रामीण पोलीस आणि अग्निशामक दल पोहचले असल्याचे कळते. या आगीत जीवितहानी झाली का याची माहिती अजून समोर आलेली नसून पोलिसांच्या तपासाअंती कळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

धारूरमध्ये शेतकरी लाईटला त्रस्त; क्रेशरवाल्यांचा ‘ओव्हरलोड’ तर अधिकारी बेफिकीर! शेतकऱ्यांचा प्रश्न कोण ऐकणार?

मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

ज्ञानदीप विद्यालयात विदयार्थी – पालक – शिक्षक समन्वय सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम संघटनेच्या शहराध्यक्षपदी सय्यद सादिक यांची निवड

Leave a Comment